लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी शाखा वेंगुर्लेचे आयोजन
वेंगुर्ले /वार्ताहर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा वेंगुर्लेतर्फे, वेंगुर्लेत आयोजित केलेल्या वंदे मातरम' देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेत आजगांव येथील जि. पू. प्रा. शाळा आजगांव या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच द्वितीय क्रमांक अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या शाळेने तर तृतीय क्रमांक वेंगुर्लेतील पूर्ण प्राथमिक शाळा नं. 4 ने पटकावला. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखा वेंगुर्ले यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनाचे औचित्य साधून प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे
वंदे मातरम’ देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन येथील रा. कृ. पाटकर हायस्कूलच्या जुबिली हॉलमध्ये केले होते. या स्पर्धेसाठी 11 संघानी सहभाग घेतला होता .
पारितोषिकांचे वितरण माजी सभापती जयप्रकाश चमणकर, लोकमान्य शाखा, वेंगुर्लेचे शाखाधिकारी पुरुषोत्तम राऊळ, चक्रपाणी गवंडी, शिरोडा लोकमान्य शाखेच्या शाखाधिकारी अनुराधा मसूरकर, परूळे लोकमान्य शाखेचे शाखाधिकारी मयूर पिंगुळकर, श्रुती टोपले, स्पर्धेचे परीक्षक सागर कुडाळकर, प्रार्थना हळदणकर, पाटकर हायस्कूलचे प्रा. महेश बोवलेकर यांच्या हस्ते करण्यात आले.