Tarun Bharat

आकाश निंगराणी ज्युनियर मि. बेळगाव

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव जिल्हा शरीरसौष्टव संघटना व मोरया जीम यांच्या संयुक्त विद्यमाने टॉप टेन ज्युनियर मि. बेळगाव शरीरसौष्टव स्पर्धेत आकाश निंगराणी याने ज्युनियर मि. बेळगाव हा मानाचा किताब पटकाविला.

हेमू कलानी चौक येथे आयोजित केलेल्या ज्युनियर मि. बेळगाव टॉप टेन स्पर्धेचे उद्घाटन आ. अनिल बेनके, बाळकृष्ण तोपिनकट्टी, ज्येष्ट शरीरसौष्टवपटू प्रणय शेट्टी, नितीन चिकोर्डे, गौरांग गेंजी, पूजा पाटील, वैशाली भातकांडे, श्रद्धा तोपिनकट्टी, स्वाती गेंजी, शेखर जानवेकर आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व हनुमान मूर्तीच्या पूजनाने करण्यात आले. या स्पर्धेत 50 हून अधिक शरीरसौष्टवपटूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये आकाश निंगराणी याने ज्यु. मि. बेळगाव हा मानाचा किताब पटकाविला. गणेश पाटीलने दुसरा, प्रसाद बेळगावकरने तिसरा, रोहन अल्लूरने चौथा, सुहास दिवटेने पाचवा, मंदार देसाईने सहावा, सतीश लोंढेकरने सातवा, नागाप्पा नीलने आठवा, मंथन धामणेकरने नववा, स्वयं पद्मण्णावरने दहावा क्रमांक मिळविला.

विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुणे प्रणय शेट्टी, गौरांग गेंजी, पूजा पाटील, वैशाली भातकांडे, श्रद्धा तोपिनकट्टी, स्वाती गेंजी, शेखर जानवेकर यांच्या हस्ते ज्यु.  मि. बेळगाव किताब, चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात
आले.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित सिद्दण्णावर, एम. के. गुरव, गंगाधर एम., सुनील पवार, राजू नलवडे, नूर मुल्ला, हेमंत हावळ, सुनील अष्टेकर, अनंत लंगरकांडे, प्रशांत सुगंधी, हंगिरगेकर यांनी काम पाहिले. सुनील राऊत यांनी स्टेज मार्शल म्हणून काम पाहिले. ही स्पर्धा भरण्यासाठी मोरया जीम व कांगले गल्लीतील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

निपाणीत आज रामभक्तांचा मेळावा

Patil_p

‘फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स’ सेल रिलायन्स डिजिटलमध्ये

Patil_p

दूरवाणी संघाचे सलग दोन विजय

Amit Kulkarni

पंपहाऊसमध्ये बिघाड झाल्याने विविध भागात पाणी नाही

Patil_p

बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गाला गर्लगुंजीतील शेतकऱयांचा विरोध

Patil_p

विद्यापीठाच्या दरवाजातच स्नान करून अभिनव आंदोलन

Patil_p
error: Content is protected !!