दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने बहुमत मिळविले असले तरी भाजपने महापौरपदाची निवडणूक अजूनही शिल्लक आहे असे म्हणून आपले आव्हान कायम ठेवले. आपले आव्हान ठेवताना भाजपने चंदीगडमधील दाखला दिला असून, त्या ठिकाणी त्याचा प्रतिस्पर्धी सर्वात मोठा पक्ष होता, पण सध्य़ा तिथे भाजपचा महापौर आहे.
भाजपचे आयटी प्रमुख अमित मालवीय आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले आहेत कि, “दिल्लीसाठी महापौर निवडण्याचा कआल संपला आहे. येत्या काळात कोण संख्याबळ जास्त ठेवू शकतो, तसेच नामनिर्देशित नगरसेवक कोणत्या पद्धतीने मतदान करतात यावर सर्व अवलंबून असणार आहे. जसे चंदीगडमध्ये भाजपचा महापौर आहे”
35 प्रभागांसाठी असलेली चंदीगड महापालिका निवडणुकीत 14 जागा जिंकून आप सर्वात मोठा पक्ष ठरला. पण तरीही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. पण भाजपने आपला महापौर चंदीगड महापालिकेत आणला.
दिल्ली भाजपचे प्रवक्ते तजिंदर पाल सिंग बग्गा यांनीही दावा केला की शहरात पुन्हा भाजप पक्षाचा महापौर असेल. दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) निवडणुकीत 134 वॉर्ड जिंकून AAP विजयी झाला. यामुळे सर्वात चर्चित महानगरपालिकेतील भाजपची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे.


previous post