महापालिका निवडणुकीत भाजपला मोठे नुकसान शक्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
दिल्लीत रविवारी महापालिका (एमसीडी) निवडणुकीसाठी मतदान झाले. याचा निकाल 7 डिसेंबरला लागणार असून सोमवारी बऱयाच संस्थांनी येथील मतदानोत्तर चाचण्यांचे कल जाहीर केले. त्यानुसार दिल्ली महापालिकेत केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील आम आदमी पक्ष मुसंडी मारणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आले आहेत. गुजरात आणि हिमाचल प्रदेश पोटनिवडणुकीनंतर दिल्ली एमसीडी निवडणुकीचे एक्झिट पोलही आले आहेत. सर्वात विश्वसनीय मानल्या जाणाऱया ‘आज तक – इंडिया टुडे ऍक्सिस’च्या वृत्तानुसार, दिल्ली एमसीडीमध्ये आम आदमी पार्टीच्या विजयाचे संकेत आहेत. 250 जागांपैकी भाजपला 69 ते 91 आणि ‘आप’ला 149 ते 171 जागा मिळण्याची शक्मयता आहे. एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्ष दिल्ली महापालिकेवर सरकार स्थापन करेल असा होरा व्यक्त करण्यात आला आहे. तसेच भाजप दुसऱया क्रमांकावर आणि काँग्रेस तिसऱया क्रमांकावर राहू शकतो.
दिल्ली महापालिका -एक्झिट पोल अंदाज
दिल्ली एकूण जागा -250, बहुमत – 126
संस्था भाजप आप काँग्रेस अन्य
आज-तक 69-91 149-171 3-7 5-9
टाईम्स नाऊ 84-94 146-156 6-10 0-4
इंडिया न्यूज 70-92 150-175 4-7 0-1
झी न्यूज 82-94 134-146 8-14 14-19
टीव्ही-9 94 145 8 3