Tarun Bharat

दिल्लीत ‘आप’चे नेते भारद्वाज यांची आत्महत्या

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

दिल्लीत महापालिका निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच आम आदमी पक्षाच्या (आप) टेड विंगचे सचिव संदीप भारद्वाज यांनी आत्महत्या केली आहे. राजौरी गार्डनमधील आपल्या घरी ते लटकलेल्या अवस्थेत सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांनी आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. दिल्ली एमसीडी निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने अनेक दिवसांपासून ते नाराज होते, असा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे. मात्र यावर अद्याप आपच्या एकाही नेत्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

आप नेते संदीप भारद्वाज यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आपला जीव संपवल्याची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे पथकाने सीआरपीसी कलम 174 अंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून त्यांच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरू होती. मात्र, भारद्वाज यांनी हे मोठे पाऊल कोणत्या कारणाने उचलले, याची माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही. एमसीडी निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने संदीप भारद्वाज नाराज झाल्याचा संशय व्यक्त होत असला तरी सध्या दिल्ली पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

Related Stories

नोव्हेंबरमध्येही जीएसटी संकलन 1 लाख कोटीपार

Patil_p

देशात पुन्हा रुग्णवाढ

Patil_p

‘प्रथम’ स्वयंसेवी संस्थेला इंदिरा गांधी पुरस्कार

Patil_p

वीजटंचाईच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या बैठका

Patil_p

रुग्णवाहिका सेवेचे वाजवी दर निश्चित करा

Patil_p

नोएडाचे भाजपाचे आमदार पंकज सिंह कोरोना पॉझिटिव्ह

datta jadhav