Tarun Bharat

पंजाबमध्ये आप आमदार वादात

Advertisements

 सचिवाने पोलीस अधिकाऱयाकडे मागितली लाच

वृत्तसंस्था /चंदीगड

पंजाबच्या डेराबस्सीचे आम आदमी पक्षाचे आमदार कुलजीत रंधावा हे वादात सापडले आहेत. आमदाराचे सचिव नितिन लूथरा यांनी बलटाना पोलीस स्थानक प्रमुखाकडून 1 लाख रुपयांची लाच मागितली. ही लाच न दिल्याने संबंधित पोलीस अधिकाऱयाची बदली करण्यात आली आहे. यासंबंधीचे एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. यासंबंधीची तक्रार आम आदमी पक्षाचे नेते विक्रम धवन यांनीच केली आहे. तर आमदार रंधावा यांनी स्वतःवरील आरोप फेटाळले आहेत. याप्रकरणी आता सर्वांच्या नजरा मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर केंद्रीत झाल्या आहेत. आरोग्य विभागाच्या कामांसाठी 1 टक्के कमिशन मागणारे आरोग्यमंत्री डॉ. विजय सिंगला यांना त्यांनी पदावरून हटविले होते. तसेच संबंधित नेत्याच्या विरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटकही करण्यात आली होती. आमदाराच्या विरोधात मान अशाचप्रकारची कारवाई करणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Related Stories

चन्नींच्या मानसिकतेवर केजरीवालांचे प्रश्नचिन्ह

Patil_p

दिल्लीत हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद

datta jadhav

घाऊक किंमत निर्देशांकात मोठी वाढ

Patil_p

जुलै महिन्यात 9 वेळा वाढली पेट्रोलची किंमत; जाणून घ्या आजचा दर

Rohan_P

राष्ट्रपिता महात्मा गांधींना जयंतीनिमित्त अभिवादन

Patil_p

राज्यात यापुढे लॉकडाऊन राहणार नाही

Patil_p
error: Content is protected !!