Tarun Bharat

‘आप’ची गोवा प्रदेश कार्यकारिणी बरखास्त

गोव्याच्या प्रभारी आतिशी यांची घोषणा

प्रतिनिधी /पणजी

आम आदमी पक्षाने 2022 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आपल्या प्रवासाच्या नवीन टप्प्यासाठी तयारी करत असताना काल सोमवारी आपली गोवा कार्यकारिणी बरखास्त केली असून लवकरच नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात येणार आहे.

आप दिल्ली आमदार आणि आप गोवा युनिट प्रभारी आतिशी यांनी सोमवारी पक्षाच्या निर्णयाची घोषणा केली आणि सांगितले की गोवा विधानसभा निवडणुकीत ’आप’ने चांगली कामगिरी करत दोन जागा मिळवल्या. आपच्या उत्कृष्ट ग्राउंडवर्कमुळे बाणावली आणि वेळ्ळी या दोन मतदारसंघात विजय मिळवला.   पक्षाचा विस्तार लक्षात घेऊन, आम्ही राज्यातील पक्षाच्या सर्व विद्यमान संघटनात्मक संरचना औपचारिकपणे बरखास्त करत आहोत आणि चांगल्या आणि समविचारी लोकांना पक्षात आणण्यासाठी नवीन समिती स्थापन करणार आहोत, असे आतिशी म्हणाल्या.

Related Stories

टिप्पर ट्रक-कार अपघातात चौघे जखमी

Amit Kulkarni

खनिज महामंडळासंदर्भाची फाईल कायदा खात्याकडे

Amit Kulkarni

कुळे येथे 3 एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचा शिलान्यास

Amit Kulkarni

सांखळी मतदारसंघाचा विकास साधला

Amit Kulkarni

आयएसएलमध्ये हैदराबाद – ओडिशा एफसी 1-1 अशी बरोबरी

Amit Kulkarni

स्मार्ट सीटी सीईओंची राष्ट्रीय परिषद सुरु

Amit Kulkarni