Aarey Tree Felling Case in SC : मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेतील आरे कारशेडच्या कामासाठी पुढील सुनावणीपर्यंत आरेतील एकही झाड कापू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ला दिले. तसेच पुढील सुनावणी १० ऑगस्टला होणार असल्याचे सांगितले. यामुळे पर्यावरप्रेमींना दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत एकही झाड कापू नये असे आदेश दिले. त्यामुळे ‘आरे’ चा फैसला आता १० ऑगस्टला होणार आहे.
राज्य सरकारने आरेतील कामाला देण्यात आलेली स्थगिती उठविल्यानंतर एमएमआरसीने मेट्रो ३ च्या गाडीचे डबे आणण्यासाठी अडचण ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी सुरू केली. या छाटणीच्या नावाखाली आरेत झाडे अवैधरित्या कापल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी आणि संघटनांनी केला होता. यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
‘आरे’ चा फैसला आता १० ऑगस्टला ; पुढील सुनावणीपर्यंत एकही झाड तोडू नका-कोर्टाचा आदेश
Advertisements