पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
दोन महिन्यांपूर्वी शाळकरी मुलीचे अपहरण करणाऱ्या एका तरुणावर बुधवारी कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कॅम्प पोलीस पुढील तपास करीत आहेत.
कॅम्प परिसरातील एका शाळेत शिकणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे दोन महिन्यांपूर्वी अपहरण झाले होते. अपहरणानंतर त्या मुलीला देवरवाडी डोंगर परिसरात नेऊन त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची चौकशी सुरू होती.
बसवराज गुजनाळ (वय 20, रा. धर्नट्टी) या तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी पुढील तपास करीत आहेत. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.