ऑनलाईन टीम / तरुण भारत :
कसब्यातील उमेदवार बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीनंतर बिचुकले यांनी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दिली असून, पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
बिचुकले यांनी कसबा पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आज अज्ञाताने त्यांना फोन करून अर्ज मागे घेण्यासाठी धमकावले. अर्ज मागे घे अन् पुणे सोडून जा. अन्यथा जीवे मारू अशी धमकी दिल्याचा आरोप बिचुकले यांनी केला आहे. त्यानंतर बिचुकले यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहीलं आहे. त्यामध्ये कसबा विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी धमकीचा फोन आल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. जीवाला धोका असल्याचे सांगत तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी बिचुकले यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच आचारसंहितेदरम्यान असा प्रकार घडणं ही गंभीर बाब असल्याचे बिचुकले यांनी म्हटले आहे.
अधिक वाचा : अनामत रक्कम भरण्यासाठी उमेदवाराने आणली चक्क १० हजाराची चिल्लर