वार्ताहर /उचगाव
अतिवाड येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित भव्य खुल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये नेसरी येथील अभिषेक नाईकने प्रथम क्रमांकाचे पाच हजार एक रुपये व चषक तर द्वितीय क्रमांक चंदगडच्या अनिकेत कुंटेने चार हजार एक रुपये व चषकचे बक्षीस पटकावले. या स्पर्धेत बेळगाव व चंदगड तालुक्मयातील दोनशे स्पर्धकांनी भाग घेतला होता.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी बेकिनकेरे ग्रा. पं. अध्यक्षा छब्बूताई कांबळे होत्या. उद्घाटन धनंजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रा.पं. उपाध्यक्ष भरमा व्हरकेरी तसेच प्रमुख अतिथी म्हणून मल्लाप्पा पाटील, वनिता मण्णूरकर, विद्या पाटील, आनंद पाटील, बाबू कांबळे, यल्लाप्पा बेळगावकर, सोमनाथ पाटील, उमेश पाटील, शिवाजी पाटील, कल्लाप्पा कणबरकर, आनंद पाटील, सुरेश पाटील, हनुमंत पाटील, कल्लाप्पा सुतार, पवन देसाई, अजित हलकर्णीकर, गणपतराव देसाई, नितीन पाटील, वैभव पाटील उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत राजाराम पाटील यांनी केले. या खुल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या दीडशे स्पर्धकांना मंडळाच्यावतीने मोफत टी-शर्ट देण्यात आली. तर सागर कलाप्पा पाटील (पोलीस) यांनी पहिल्या 21 क्रमांकांना मेडल आपल्या स्वखर्चाने भेटीदाखल दिले. तसेच पहिल्या क्रमांकाचे बक्षीस कल्लाप्पा सुतार बेळवटी, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस कल्लाप्पा पाटील, तृतीय क्रमांकाचे बक्षीस नितीन पाटील, चौथ्या क्रमांकाचे बक्षीस पवन देसाई, पाचव्या क्रमांकाचे बक्षीस विनोद चिखले, सहाव्या क्रमांकाचे बक्षीस कल्लाप्पा करंबळकर यांच्याकडून देण्यात आले होते. या स्पर्धेतील पहिले सात क्रमांक याप्रमाणे अभिषेक नाईक नेसरी, अनिकेत कुट्रे चंदगड, भैरू नाईक अलदार, आकाश बामणे कोट, सचिन पालेकर नेसरी, प्रमोद गावडे हल्लारवाड, रणजीत पाटील कुरिहाळ यांनी मिळविले. तर एकूण 21 स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. 200 स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी 7.30 वा. धनंजय जाधव यांच्या हस्ते ध्वज फडकवून करण्यात आला.