म्हापसा पालिका नगराध्यक्षपदाबाबत नगरसेवकांच्या प्रतिक्रिया
प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसावासियांना शहराचा विकास झालेला हवा आहे. शहराच्या विकासासाठी काम करणारा नेता हवा आहे. तो करण्यासाठी नगराध्यक्ष निवडीसाठी नागरिकांनी आपले नाव सूचविले तर ते माझे भाग्यच आहे. नगरपालिका क्षेत्रातील एका प्रभागाची जबाबदारी आपण पार पडत आहे. नगराध्यक्ष म्हणून निवड झाली तर आपली जबाबदारी वाढणार असून ती समर्थपणे पेलण्यास आपण तयार आहे. म्हापसावासियांच्या आपल्याकडून असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास आपण सक्षम आहे, अशी माहिती म्हापशाच्या नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर यांनी दै. तऊण भारतशी बोलताना दिली.
म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर म्हापसा पालिकेत नगराध्यक्ष पदासाठी विविध नावे पुढे येत आहेत. याबाबत नगरसेवकांच्या प्रतिक्रिया विचारल्या असता डॉ. बिचोलकर यांनी वरील माहिती दिली.
येणाऱ्या जबाबदाऱ्या घेऊन पुढे जाण्यासाठीच आम्ही येथे आलो आहोत. समाजासाठी काहीतरी पावती देण्यासाठी आणि त्यातूनच म्हापशासाठी काहीतरी करण्यासाठी आम्ही पाऊल पुढे घालीत आहोत. त्याची सुऊवात आपण गणेशपुरी प्रभाग सहा पासून केली आहे. विकासाची जशी गती घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही त्यासाठी वायंगणकर यांना राजीनामा द्यावा लागला, असे ऐकू येऊ येत आहे. आमदार वा भाजपाबरोबर राहून कामे केली तर विकास साधणे शक्य आहे. त्यांच्या सहकार्याने शहराचा विकास तडीस नेण्यास प्रयत्नशील आहे, असे डॉ. बिचोलकर म्हणाल्या.
म्हापशाचे चित्र बदलण्याची आपल्यात धमक : कमल डिसोझा
म्हापसा शहराचा बँकॉक, थायलंड करण्याची आपल्यात धमक आहे मात्र ते तसे होऊ शकत नाही. कारण आपल्या मागे गॉड फादर नाही. आपण अपक्ष निवडून आली. आपल्यामागे सर्व लोक आहे तेच आपले गॉड फादर आहेत. आपण एक अपक्ष नगरसेवक म्हणून लोकांच्या आधारावर निवडून आली आहे अशी माहिती नगरसेविका कमल डिसोझा यांनी दिली.
गटार कामाचा प्रारंभ ही अभिनंदनीय गोष्ट- आशीर्वाद खोर्जुवेकर
खोर्ली सिम येथील गटाराच्या पाण्याचा अनेकांना त्रास होत होता. येथे पावसात गटाराचे पाणी भरून सर्वत्र ये-जा करणाऱ्यावर उडत होते. सर्वत्र दुर्गंधी पसरत होती मात्र या गटाराच्या बांधकामाचा शुभारंभ झाला ही अभिनंदनीय गोष्ट आहे. याचे श्रेय नगराध्यक्ष व नगरसेविका कमल डिसोझा यांना जाते. कारण त्यांनी परिश्रम घेऊन हे काम हाती घेतले असे नगरेसवक आशीर्वाद खोर्जुवेकर म्हणाले. अशीच विकास कामे सर्वांनी करावी. म्हापशाच्या सर्व प्रभागात अशी विकासकामे व्हावीत असे नगरसेवक खोर्जुवेकर म्हणाले.