Tarun Bharat

अबुधाबी टी-10 क्रिकेट स्पर्धा नोव्हेंबरात

Advertisements

वृत्तसंस्था/ अबुधाबी

सहाव्या अबुधाबी टी-10 क्रिकेट स्पर्धेला 23 नोव्हेंबरपासून येथील झायेद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांचा समावेश राहिल. सदर स्पर्धा अधिक आकर्षक करण्यासाठी या संघांचे सर्व फ्रांचायझी प्रयत्नशील आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना 4 डिसेंबरला खेळविला जाईल.

या स्पर्धेमध्ये विद्यमान विजेता डेक्कन ग्लेडिएटर्स, बांगला टायगर्स, दिल्ली बुल्स नॉर्दर्न वॉरियर्स, चेन्नई ब्रेवेस, अमेरिकेतील न्यूयॉर्क स्ट्रायकर्स आणि मॉरिसव्हिले सॅम्प आर्मी या संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस राहिल. डेक्कन ग्लेडिएटर्स संघात निकोलास पुरन, आंद्रे रसेल, मुजीब उर रेहमान, ओडेन स्मिथ, झहीर खान, जेसन रॉय, तस्कीन अहमद यांचा तर बांगला टायगर्समध्ये शकीब अल हसन, लेविस, मुनेरो, बेन कटिंग, मोहमद अमीर, नुरुल हसन, झेजाई, दिल्ली बुल्समध्ये ड्वेन ब्रॅव्हो, टिम डेविड, जॅक्स, सिराज अहमद, इमाद वासीम, गुरबाज, ड्रेक्स, एन. झेद्रान, चेन्नई ब्रेवेसमध्ये लंकेचा शनाका, कार्लोस ब्रेथवेट, भानुका राजपक्षे, मॅकॉय, महेश तिक्श्ना, स्टोन, डकेट, कुक, सिकंदर रजा यांचा समावेश आहे. या स्पर्धेचे दोनवेळा विजेतेपद मिळविणाऱया नॉर्दर्न वॉरियर्स संघात लंकेचा हसरंगा, रुदरफोर्ड, टॉप्ले, उस्मान खान, लेविस, मोहमद इरफान आणि चमिराचा समावेश आहे.

Related Stories

मोहन बगान ‘नॅस्डॅक’वर सूचिबद्ध

Patil_p

दिल्ली कॅपिटल्सचा मुंबई इंडियन्सला धक्का

Patil_p

न्यूझीलंडतर्फे फिलिप्सचे वेगवान शतक

Patil_p

अरेबियन टेनिसपटू जेबॉर अंतिम फेरीत

Patil_p

मुख्यमंत्री पटनाईक यांच्याकडून दुती चंदचे अभिनंदन

Patil_p

शर्मादाची झील देसाईविरुद्ध अंतिम लढत

Patil_p
error: Content is protected !!