Tarun Bharat

सत्तरीतील बंधाऱयात मुबलक पाणीसाठा

प्रतिनिधी /वाळपई

सत्तरी तालुक्मयातील बंधाऱयांमध्ये अजूनही चांगला पाणी साठा शिल्लक आहे. यंदा योग्यवेळी बंधारे अडविण्यात आल्यामुळे शेतकऱयांना चांगला फायदा झाला आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी जलसिंचन खात्याच्या कारभारावर समाधान व आनंद व्यक्त केलेला आहे.

रगाडा, वाळवंटी, वेळूस, म्हादई अशा अनेक नद्यांवर ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ योजनेंतर्गत बंधारे बांधण्यात आले आहेत. यासाठी जवळपास 120 कोटी खर्च केले आहेत. बंधारे उभारल्यामुळे चांगला पाणी साठा होऊन त्याचा अनुकूल परिणाम सत्तरीतील शेती बागायतीवर झालेला आहे. अनेक भागातील पडिक जमिनीचे रूपांतर शेती बागायतीमध्ये झाले आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून पावसाळी पाण्याचा साठा बंधाऱयात शेवटच्या टप्प्यापर्यंत शिल्लक राहत नव्हता. कारण बंधाऱयाच्या फळय़ा योग्यरित्या टाकण्यात येत नव्हत्या. यामुळे मोठय़ा प्रमाणात पाण्याची गळती होऊन बंधारे पूर्णपणे सुकून जायचे. यंदा मात्र चित्र पूर्णपणे बदललेले पाहावयास मिळत आहे. कारण सर्वच बंधाऱयावर लोखंडी फळय़ा घातल्यामुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत पाण्याचा साठा उपलब्ध राहिलेला आहे. पावसाळी मोसमाला अवघे आठ दिवस शिल्लक असताना सत्तरी तालुक्मयातील 80 टक्के बंधाऱयांमध्ये आजही मोठय़ा प्रमाणात पाणी साठा उपलब्ध  आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी आनंद व्यक्त केलेला आहे.

वाळपई जलसिंचन खात्याचे साहाय्यक अभियंता शैलेश पोकळे यांनी सांगितले की, यंदा बंधाऱयांवर पाणी अडविताना विशेष काळजी घेण्यात आलेली आहे. कोणतीही निष्काळजीपणा होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्यात आले. त्यामुळे शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

कोपार्डे येथील पाण्याचे लाभार्थी रामा सावंत, नाणूस येथील शेख इक्बाल, वेळूस सत्तर येथे दत्ताराम गावकर यांनी सांगितले, यंदा मुबलक पाणी साठा उपलब्ध झाला.

Related Stories

पहिल्या मजल्यावरून खाली कोसळल्याने हेडलॅण्ड सडय़ावर मुलीचा मृत्यू

Omkar B

पाणी पुरवठा खात्याचे कर्मचारी सुरेश मांद्रेकर यांचा सन्मान

Amit Kulkarni

मतदारसंघ पुनर्रचना, राखीवता ठरवण्याचे नेमके काम कोणाचे?

Patil_p

सासष्टीत 68.33 टक्के मतदान

Amit Kulkarni

‘माझे घर, मालकी हक्क’

Amit Kulkarni

सांखळीवासीयांमुळेच राज्याचा विकास करण्याची संधी

Patil_p