बाप-लेकावर गुन्हा दाखल ; गुन्हा दाखल न करण्याची वडिलांनी दिली होती धमकी
प्रतिनिधी/ सातारा
शहरातील एका भागात राहत असलेल्या अल्पवयीन मुलीवर वर्ये गावच्या युवकाने अत्याचार केला. त्याचा विडिओ बनवून पुनहा जबरदस्ती संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. ही बाब युवकांच्या वडिलांना कळताच त्यांनी मुलीला पोलीस ठाण्यात जाऊ नकोस नाहीतर कुटुंब उद्धवस्त करीन अशी धमकी दिली होती. यामुळे मुलीच्या तक्रारीवरून बाप-लेकावर शहर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा शेखर महेश ननावरे (वय 20) व वडील महेश ननावरे अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जात असताना शेखर ननावरेने तिचा पाठलाग केला. तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. हे सर्व करताना त्याने याचा विडिओ बनवला. तिला वर्ये येथील राहत्या घरी नेऊन तिच्याशी जबरदस्ती शरीर संबंध ठेवले. वारंवार तिला शरीरसंबंध ठेवण्यास, बोलण्यास भाग पाडत होता. फोटो, विडिओ व्हायरल करण्याची वारंवार धमकी देत होता. हा प्रकार शेखर याचे वडील महेश ननावरे यांना समजला. त्यांनी मुलीला शेखर याने काढलेला विडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. पोलीस ठाण्यात तक्रार करू नकोस नाहीतर तू अडचणीत येशील असे सांगितले. यामुळे मुलीने घडलेला प्रकारबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
त्यामुळे बाप-लेकावर पोक्सो अंतर्गत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी शेखरला अटक केली असून त्याला हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोटे करत आहेत.