Tarun Bharat

अभाविपचे राज्यस्तरीय संमेलन 6 पासून

नेहरूनगर येथील केएलई संस्थेच्या जिरगे सभागृहात आयोजन : शिक्षणतज्ञ- विद्यार्थी सहभागी होणार

प्रतिनिधी/ बेळगाव

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) चे 42 वे राज्यस्तरीय संमेलन 6 ते 8 जानेवारी दरम्यान बेळगावमध्ये होणार आहे. नेहरूनगर येथील केएलई संस्थेच्या जिरगे सभागृहात हे संमेलन होणार असून यामध्ये राज्यभरातील शिक्षणतज्ञ व विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती अभाविपचे राज्य सचिव मणीकंठ कळसा यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

अभाविप ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. शिक्षणातील गुणवत्ता वाढीसह विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांवर संघटना कार्य करते. बेळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय संमेलनात लोकसंख्येचा असमतोल, देशात होणारी जी-9 परिषद इतर विषयांवर चर्चा केली जाणार आहे. राज्यभरातील 1500 हून अधिक विद्यार्थीप्रतिनिधी, शिक्षणतज्ञ, प्राध्यापक यामध्ये सहभागी होतील. तसेच कर्नाटक उत्तर व दक्षिण विभागाच्या नूतन कार्यकारिणीची निवड यावेळी करण्यात येणार आहे.

शहरात निघणार भव्य शोभायात्रा

7 जानेवारी रोजी शहरातून मोठी शोभायात्रा काढली जाणार आहे. सायंकाळी 7 वाजता शोभायात्रेला सुरुवात होणार असून नेहरूनगर येथील जेएनएमसी येथून सुरुवात होणार असून चन्नम्मा सर्कल, काकतीवेस, गणपत गल्ली, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, समादेवी गल्ली, धर्मवीर संभाजी चौक येथून लिंगराज कॉलेज मैदानावर सांगता होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अभाविपचे वैद्यकीय प्रमुख डॉ. आनंद होसूर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य रोहित हुमणाबादीमठ, शहर सचिव प्रीतम हुपरी उपस्थित होते.

Related Stories

आविष्कार फौंडेशनचा शिक्षक पुरस्कार चिगुळकर यांना प्रदान

Amit Kulkarni

कार पुलावरून कोसळून प्राध्यापक ठार

Amit Kulkarni

प्रभाकर कोरे यांनी घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट

Amit Kulkarni

ता.पं.कार्यालयात गळती अन् साहित्याची भाऊगर्दी

Amit Kulkarni

उड्डाणपुलावरील दुसऱया बाजूच्या रस्त्याची दुरुस्ती कधी?

Patil_p

शेतकऱयांवर वाहन चालविणाऱया चालकांवर कारवाई करा

Amit Kulkarni