Tarun Bharat

VIDEO>विद्यापीठाच्या अधिसभेत घुसले अभाविपचे विद्यार्थी; कुलगुरू आणि प्रशासनाविरोधात घोषणा

शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी घुसून गोंधळ घातला. विद्यार्थ्यांच्या या कृतीने अधिसभा सदस्यांनी सभागृह सोडून सभेचा त्याग केला. या घटनेमुळे शिवाजी विद्यापिठ प्रशासनामध्ये खळबळ माजली असून विद्यापीठाकडून अजून यावर कोणतीही प्रितिक्रिया आलेली नाही.

पहा VIDEO >>>>> विद्यापीठाच्या अधिसभेत अभाविपचा गोंधळ

शिवाजी विद्यापीठामध्ये आज अधिसभेचे आयोजन होते. सभा चालु असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी सभागृहात घुसून एकच गोंधळ घातला. सभागृहात कुलगुरुंच्या विरोधात घोषणा देण्यात येऊन विद्यापीठ प्रशासनाचा निषेध विद्यार्थ्याकडून करण्यात आला.

या गोंधळात अभाविपचे विद्यार्थी कोणाचेही ऐकत नसल्याने काही अधिसभा सदस्यांनी सभागृह सोडून सभात्याग केला. कुलगुरू किंवा इतर सदस्यांचे न ऐकता कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणा देऊन एकच गोंधळ निर्माण झाल्याने वातावरण तणावपुर्ण बनले होते.

Related Stories

कंगनाचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; आज मुंबईत येणार

Tousif Mujawar

बार्शीत शालेय पोषण आहारातील ११० टन तांदूळ झाला वाटप

Archana Banage

भुदरगड मध्ये मराठा समाजामार्फत पाटगाव ते आदमापूर संघर्ष यात्रा

Archana Banage

जुन्या, जाणत्या शिवसैनिकांवर जबाबदारी अन् मदार !

Kalyani Amanagi

सोलापूर : साडे-शेलगाव रस्त्याची दुरावस्था, वाहतूकदार झाले हैराण

Archana Banage

कोल्हापूर : स्वच्छ सर्वेक्षण 2020 या अभियानांतर्गत कुरुंदवाड पालिका राज्यात 27 वी

Archana Banage