Tarun Bharat

बेळगावसह राज्यात 21 ठिकाणी एसीबीचे छापे

सार्वजनिक बांधकामच्या अधिक्षक अभियंत्यांच्या घरातही तपासणी

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगावसह राज्यातील 21 सरकारी अधिकाऱयांच्या निवासस्थानावर एसीबीने धाड टाकली आहे. शुक्रवारी सकाळपासून ही कारवाई सुरू असून बेळगाव येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिक्षक अभियंते भीमराव पवार यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे.

टिळकवाडी येथील घर, बेळगाव येथील कार्यालय, निपाणी येथील घर, बोरगांव येथे उभारण्यात आलेली इमारत अशी एकूण सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले असून उत्तर विभागाचे पोलीस अधिक्षक बी. एस. न्यामगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक करुणाकर शेट्टी, प्रकाश रेड्डी, पोलीस निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, निरंजन पाटील, नियाज बेग यांच्यासह 25 हून अधिक अधिकाऱयांनी या कारवाईत भाग घेतला आहे.

अधिकाऱयांनी भीमराव पवार यांच्या निवासस्थानी सोन्या, चांदिचे दागिने, रोकड ताब्यात घेतली असून त्याची मोजदात सुरू आहे.

Related Stories

जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Amit Kulkarni

बुडा कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

Amit Kulkarni

10 हजारहून अधिक बसपास विद्यार्थ्यांच्या हातात

Amit Kulkarni

साईराज वॉरियर्स, दैवज्ञ स्पोर्टस् क्लब विजयी

Patil_p

चाक गेले पुढे पुढे… बस पाठीमागे

Amit Kulkarni

पहिले रेल्वेगेट परिसरात दुरुस्तीचे काम

Amit Kulkarni