उद्योग खात्रीतून नवीन तलावाच्या कामाला प्रारंभ : मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा करणार, रोहयो कर्मचाऱयांना रोजगार


प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव तालुक्मयातील अनेक तलावांना उद्योग खात्रीची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे आता अनेक तलावांचे पुनरुज्जीवन होत असून अनेक तलावांत पाणीसाठाही होत आहे. त्यामुळे यापुढे आणखी तलावांची खोदाई करण्यात येणार आहे. विशेष करून डोंगराळ भागातील दरीत छोटेखानी धरणांची उभारणी करण्यात येत आहे. होनगा येथेही अशाच प्रकारे छोटेखानी तलाव व धरणाची उभारणी करण्यात आली असून त्याला उद्योग खात्रीची जोड देण्यात आली आहे.
उद्योग खात्री योजनेतून बेळगाव तालुक्मयाचा विकास साधण्यात येत आहे. त्यामुळे वेगवेगळय़ा ठिकाणी योजनेंतर्गत तलाव खोदाईचे काम हाती घेऊन कामगारांना काम दिले आहे. 500 हून अधिक कामगारांना काम देत होनगा येथील हेग्गेरे तलावाची खोदाई करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या तलावात मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा होणार असून परिसरातील शिवाराला आणि शेतकऱयांना याचा फायदा होणार आहे.
होनगा येथील तलावांच्या खोदाईसाठी उद्योग खात्रीतील कामगारांना काम मिळाले असून यानंतर शेतीमधील पाणंद रस्त्यांच्या डागडुजीसाठी उद्योग खात्रीतून प्रयत्न करण्यात येणार आहेत. बेळगाव तालुक्मयात उद्योग खात्री योजनेतून वेगवेगळी कामी हाती घेण्यात येत आहेत.
या तलावांच्या कामाचा आराखडा तयार करण्यात आला नव्हता. त्यामुळे तेथील कामगार वारंवार कामाची मागणी करत होते. त्यामुळे परिसरात तलाव खोदण्यासाठी 500 कामगारांना काम देण्यात आले. तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ता. पं. साहाय्यक सचिव राजेंद्र मोरबद यांनी उद्योग खात्रीतील कामांना गती दिली आहे.