कोल्हापूर/प्रतिनिधी
दुचाकीवरुन जात असताना मागून येणार्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने निवृत्त पोलिस अधिकारी सुभाष खानविलकर यांचा अपघाती जागीच मृत्यू झाला आहे. कोल्हापुरातील शांतिनिकेतन येथे हा अपघात झाला. सुभाष खानविलकर असे मृत अधिकार्याचे नाव आहे. ही घटना साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. खानविलकर हे मुंबई येथे सेवेत होते. ते काहीवर्षांपूर्वी सेवेतून निवृत्त झाले होते.