Tarun Bharat

बेळगाव कॅम्प परिसरातील अपघातात विद्यार्थी ठार, जमावाकडून ट्रकची तोडफोड

बेळगाव : भरधाव ट्रकने दुचाकी व कारला ठोकरल्याने एक शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी ०८. ३० वाजण्याच्या सुमारास कॅम्प येथील वेलकम हॉटेलजवळ हि घटना घडल. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करत ट्रक जाळण्याचा प्रयत्न केला. संतप्त जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या घटनेनंतर कॅम्प परीसरात तणाव निर्माण झाला आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, बेळगाव कॅम्प परिसरात लोखंडाच्या सळ्या घेऊन जाणारा ट्रकने मोपेडला धडक दिली. हि घटना सकाळी ०८.३० च्या दरम्यान घडली. या धडकेत अरहान उर्फ फारूख बेपारी (वय १० रा. कॅम्प परिसर) हा विद्यार्थी जागीच ठार झाला. तर त्याची बहीण अतिका उर्फ अफसाना (वय १८) जखमी झाली. तर या धडकेत आणखी एक विद्यार्थी जखमी झाला. आयुष आजरेकर (वय १२ रा. भाग्यनगर) असे जखमी विद्यार्थ्यांचे नाव आहे. अपघात होताच जमावाने गर्दी केली. अपघातात अरहान उर्फ फारूख बेपारीच्या मृत्यू झाल्याचे समजताच जमाव संतप्त झाला. त्यांनी ट्रॅकवर दगडफेक करत तोडफोड केली. त्यानंतर हा ट्रक जमावाने पेटवण्याचा प्रयत्न केला. हि घटना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र जमाव नियंत्रणात येत नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. दरम्यान संतप्त जमावाने ट्रकवरती पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच दखल घेऊन जमावाला पांगवल्याने अनर्थ टळला.

Related Stories

सीमाहद्दीवर सतर्कता बाळगा

Omkar B

तालुका म. ए. समितीची बैठक उद्या

Patil_p

सर्व्हरडाऊनमुळे आयटीआय विद्यार्थी परीक्षेला मुकले

Amit Kulkarni

राज्यात सर्वाधिक खटले बेळगाव जिल्हय़ातच प्रलंबित

Amit Kulkarni

बेळगावात मटका, जुगारावर आळा घाला

Amit Kulkarni

आर.व्ही.देशपांडे यांच्याकडून प्रचाराचा धडाका

Amit Kulkarni
error: Content is protected !!