देवगड/ प्रतिनिधी
देवगड दाभोळे येथील डॉ. पाटणकर यांच्या हॉस्पिटलसमोर एका अवघड वळणावर एसटीची मोटारसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार विश्वनाथ हरी कोंडूसकर (55, रा. इळये पाटथर) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात बुधवारी सकाळी 10.30 वा. च्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर देवगड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव, कॉन्स्टेबल निलेश पाटील यांच्यासह देवगड एसटी प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
Previous Articleएसटी कर्मचाऱ्यांचा संप! सांगलीत एसटी वाहतूक ठप्प! प्रवाशांचे हाल
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # NEWS EDITOR # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg