Tarun Bharat

झुआरीनगरात अपघात, नवेवाडेतील युवक ठार

Advertisements

प्रतिनिधी /  वास्को

झुआरीनगरात बुधवारी रात्री झालेल्या रस्ता अपघातात नवेवाडे वास्कोतील प्रसाद लक्ष्मण फोंडेकर(54) हा जागीच ठार झाला. दोन दुचाकींमध्ये समोरासमोर हा अपघात झाला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात बुधवारी रात्री साडे नऊच्या दरम्यान एमईएस कॉलेज नाक्याजवळ झाला. यात प्रसाद हा जागीच ठार झाला. मयत प्रसाद हा रात्री आपले काम आटपून नवेवाडेतील घरी येत होता. एमईएस कॉलेज नाक्यावर पोहोचताच एमईएस कॉलेजजवळील वसाहतीतून एका दुचाकीस्वाराने बिर्लातील मार्केटच्या दिशेने जाण्यासाठी भरधाव नाका पार करून प्रसादच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे प्रसाद रस्त्यावर फेकला जाऊन ठार झाला.

प्रसाद हा अविवाहीत होता. त्याच्यामागे आई वडिल भाऊ बहिणी असा परीवार आहे. या अपघात प्रकरणी एमईएस कॉलेजजवळील अमन कॉलनीत राहणाऱया प्रदीप यादव या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान, एमईएस कॉलेजजवळील नाक्यावर सध्या अपघातांचे प्रमाण वाढलेले असून तेथील लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. बहुतेक सर्व अपघात चालकांच्या निष्काळजीपणामुळे होत असल्याने या नाक्यावर सी.सी. टी.व्ही. कॅमेरे तसेच वाहतुक बेट व अन्य सुरक्षा उपाय करावेत अशी मागणी स्थानिक लोकांकडून होऊ लागलेली आहे.

Related Stories

गावी जाण्यासाठी कामगारांचा पेडणेत रास्ता रोको

Patil_p

हसापूर सातेरी-ब्राह्मणी देवीचा 12 पासून वर्धापनदिन सोहळा

Amit Kulkarni

शिमगोत्सव मिरवणुकीने फातोर्डा परिसर दुमदुमला

Amit Kulkarni

‘रणांगण’ नाटय़ोपयुक्त घटकांचा सुयोग्य समन्वय

Patil_p

विरोधकांचा सभागृहात प्रचंड गदारोळ

Amit Kulkarni

कवळेकर यांनी केलेल्या कामांचे श्रेय आमदार डिकॉस्तांनी घेऊ नये

Amit Kulkarni
error: Content is protected !!