निपाणी- मुधोळ- निपाणी महामार्ग 18 गुर्लापूरजवळ झालेल्या अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. धारवाडहून कप्पलगुद्दीकडे निघालेली टाटा टियागो, लोकापूरहून पुण्याच्या दिशेने जाणारी एर्टिगा कारला धडकली आणि या भीषण अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. कप्पलगुद्दी येथील रहिवासी दुंडप्पा अडिवेप्पा बुडिगेरे (३४) आणि त्यांची बहीण भाग्यश्री नवीन कंबार (२२) अशी मृतांची नावे आहेत. अपघातातील इतर जखमींना गोकाक उमराणीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


previous post