Tarun Bharat

काळाचा घाला ! पुणे-बेंगळूर महामार्गावर दोन बहिणींचा अपघात; एकीचा मृत्यू

कराड/प्रतिनिधी

पुणे-बेंगळूर महामार्गावर (pune bangalore highway) काॅलेजवरून घरी निघालेल्या दुचाकीवरील दोन बहिणांना एका चारचाकी गाडीने जोरदार धडक दिली. यामध्ये दोघींना कराड येथील कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, यामधील एका बहीणीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबतची फिर्याद किशोरी धोंडीराम लोहार (वय- 22, रा. गोवारे, ता. कराड) हिने दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी दि. 24 मे फिर्यादी किशोरी लोहार व चुलत बहीण कल्याणी संजय लोहार हीच्या सोबत अॅक्टीव्हा गाडीवरून कृष्णा फाऊंडेशन येथील काॅलेज गेल्या होत्या. यावेळी कल्याणी लोहार ही गाडी चालवित होती तर किशोरी पाठीमागे बसलेली होती. दुपारी महामार्गावर रस्ता क्राॅस करताना कराडच्या बाजूने येणाऱ्या एका चारचाकी क्रेटाने अॅक्टीव्हा गाडीला जोराची धडक दिली. या धडकेत कल्याणी लोहार ही चारचाकी गाडी सोबत फरपटत पुढे थोडे अंतरावर गेली. तर किशोरी गाडीवरून पडल्याने तिला दुखापत झालेली होती.

अपघाताच्या घटनास्थळावरील लोकांच्या मदतीने दोन्ही बहिणींना उपचारासाठी कृष्णा हाॅस्पिटल कराड येथे दाखल करण्यात आले होते. यामधील कल्याणी लोहार हिचा बुधवारी दि. 25 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी चारचाकी गाडीचा चालक रियाज बालेचाँद आत्तार (रा. लोणंद ता. खंडाळा जि. सातारा) याचे विरोधात फिर्यादीने तक्रार दिली आहे.

Related Stories

भोसे येथील विपुल इंगवले यांना वीरमरण

Patil_p

अफझल खानाच्या कबरीशेजारील अतिक्रमण हटवा

Patil_p

साताऱयात स्व.रामविलास पासवान यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Patil_p

‘तोक्ते’ चक्रीवादळामुळे जिल्ह्यात नुकसान

datta jadhav

विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरांनी हुतात्मा जवान सुजित किर्दत यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन

Archana Banage

कोरोना संपला नाही काळजी घ्या

Patil_p