शालेय विद्यार्थ्यांनी बचावली
उमदी/प्रतिनिधी
उमदी ता.जत येथे उमदी पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर उमदी पासून ४ किलोमीटरच्या अंतरावर डंपर ला ओव्हरटेक करत असताना दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. यात एक शालेय विद्यार्थिनीही किरकोळ जखमी आहे.
अधिक माहिती अशी की, उमदी पासून ४ किलोमीटर अंतरावर उमदी पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावरून मयत भिमराव मायाप्पा पडवळे (वय-४५) हे उमदी हुन आपल्या गावी असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील शिवणगी या ठिकाणी भावाच्या मुलीस शाळेतून मोटारसायकलवरून घेऊन घराकडे निघाले होते. तर समोरून मयत ईराप्पा बिराजदार हा ट्रक्टर ड्रायवर होता. त्याने शिवणगी येथील एका ऊसतोडणी गाडीवर तो ड्रायव्हीग करतो म्हणून उचल घेतली होती. तो उटगी रा, जत येथील रहिवाशी असलेल्या मुकादमास भेटून मोटारसायकल वरून आपल्या गावी उटगी कडे जात होता. यावेळी इरापा बिराजदार यांने डंपरला ओव्हरटेक करत समोरुन येणाऱ्या पडवळे यांच्या मोटारसायकल गाडीला जोराची धडक दिली. या अपघातात शिवणगी येथील भिमराव उर्फ बी.एम.पडवळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर उटगी येथील ईराप्पा बिराजदार याला उपचारासाठी सांगली कडे घेऊन जात असताना वाटेतच त्याचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी भगवान कोळी, कपिल काळे, सिद्धेश्वर मोरे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला व तात्काळ रुग्णवाहिकेला बोलवून जखमीला उपचारासाठी पाठवले. सदर अपघाताची नोंद उमदी पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत. या घटनेने मात्र उमदी, उटगी व शिवणगी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.