Tarun Bharat

सिन्नर-शिर्डी महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात; 10 ठार

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरेजवळ आज पहाटे खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस मुंबईहून शिर्डीकडे जात होती.
सिन्नर-शिर्डी महामार्गावर पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाके दरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती. आज पहाटे या बसची आणि मालवाहू ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की बसचा अक्षरशः चक्काचूर झाला. या बसमध्ये अंबरनाथ ठाणे परिसरातील जवळपास 50 प्रवासी प्रवास करत होते. त्यामधील 10 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 12 प्रवाशी जखमी झाले. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत

अपघाताबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Related Stories

सांगली : तर संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करणार

Archana Banage

पंतप्रधान मोदी आजही उद्धव ठाकरे यांच्यासाठी ‘नरेंद्रभाई; संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

Archana Banage

Sangli; जत तालुक्यातील कुडणुरात दुसऱ्यांदा सापडला हॅंडग्रेनेड बॉम्ब

Abhijeet Khandekar

रवी राणांचा ‘मातोश्री’वर जाण्याचा मुहूर्त ठरला

datta jadhav

‘प्रत्येकाला त्यांचा देव निवडण्याचा अधिकार’; सर्वोच्च न्यायालयाने ‘परमात्मा’ फेटाळली याचिका

Abhijeet Khandekar

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारवर येऊ शकते कर्ज काढण्याची वेळ : विजय वडेट्टीवार

Tousif Mujawar