म्हैस आडवी आल्याने चंपक मैदानासमोरची दुर्घटना
रत्नागिरी
रत्नागिरीमधील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक ओंकार उदय बाणे (30, गुरुमळी, रत्नागिरी) यांचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाल़ा सोमवारी रात्री 11 च्या सुमारास चंपक मैदानासमोर रस्त्यावर म्हैस आडवी आल्याने हा अपघात झाल़ा ओंकारच्या मृत्यूने रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आह़े
ओंकार कबड्डी, खो-खो, क्रिकेट आदी खेळात निपूण होत़ा मागील 6 वर्षापासून गोगटे-जोगळेकर महाविद्यालय येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होत़ा सोमवारी रात्री 10.30 वाजेपर्यंत तो मित्रांसोबत गप्पा मारत होत़ा त्याचदरम्यान एक फोन आल्याने मोटारसायकल (एमएच 08 एएल 4526) घेवून तो घरातून बाहेर पडला होत़ा परटवणे ते उद्यमनगर रस्त्याने जात असताना 11 च्या सुमारास रस्त्यावर म्हैस आडवी आल्याने हा अपघात झाल़ा
यामध्ये ओंकारच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल़ी त्याला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱयांनी तपासून मृत घोषित केल़े
ओंकारच्या निधनाचे वृत्त समजताच आप्तेष्ट, गुरूमळी व रत्नागिरीतील त्याच्या मित्र-परिवाराने शासकीय रूग्णालयात धाव घेतल़ी सर्वांना मदत करणारा अशी त्याची ओळख होत़ी क्रीडा शिक्षक व एक उत्तम खेळाडू म्हणून नवोदित खेळाडूंना त्याचे उत्तम मार्गदर्शन लाभत होत़े मंगळवारी गुरूमळी येथे शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अत्यसंस्कार करण्यात आल़े