वृत्तसंस्था/ शिलाँग
तामीळनाडूचा 18 वर्षीय टेबलटेनिसपटू विश्वा दीनदयालनचे रविवारी वाहन दुर्घटनेत अकाली निधन झाले. शिलाँगमध्ये होणाऱया 83 व्या वरिष्ठ राष्ट्रीय आणि आंतरराज्य टेबलटेनिस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विश्वा आपल्या तीन साथीदारांसह मोटारीतून प्रवास करत असताना त्याच्या मोटारीला अपघात झाला. गौहत्ती येथून विश्वा आणि त्याचे तीन साथीदार कारने शिलाँगला जात असताना विरूद्ध दिशेने येणाऱया एका अवजड वाहनाने त्यांच्या मोटारीला जोरदार धडक दिली. या अपघातात सदर कारचा चालक जागीच ठार झाला. तर गंभीर दुखापत झालेल्या विश्वाला रूग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले