वॉशिंग्टन / वृत्तसंस्था
अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स येथे एका रस्ते अपघातात तीन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मृत झालेले तिन्ही विद्यार्थी दक्षिण भारतातील रहिवासी आहेत. पवनी गुलापल्ली (22), प्रेमकुमार रेड्डी गोडा (27) आणि साई नरसिंह (22) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात पाच जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मॅसॅच्युसेट्स पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत. दोन कारमधील अपघातात तिघांना प्राण गमवावे लागल्याची माहिती पोलीस दलाकडून जारी करण्यात आली. त्यानंतर भारतीय दुतावासाकडूनही यासंबंधी दुजोरा देण्यात आला.