Tarun Bharat

पाच महिन्यात 110 जणांचा अपघाती मृत्यू

स्थानिकांसह पर्यटकांचाही समावेश : गती नियंत्रित न ठेवल्याने अपघात

प्रतिनिधी /पणजी

राज्यात अपघातांची संख्या मोठय़ाप्रमाणात वाढली असून, गेल्या पाच महिन्यांत म्हणजे जानेवारी ते मे 2022 या काळात तब्बल 110 जणांचा वाहन अपघातात मृत्यू झाला आहे. यामध्ये 65 दुचाकी चालकांचा समावेश आहे. एकूण 1 हजार 348 अपघात झाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत 16 टक्के अपघात वाढले तर 28 टक्के वाहन अपघातात ठार झालेल्यांच्या संखेत वाढ झाली आहे.

  गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यावर्षी अपघातांची संख्या तसेच अपघातातील मृत्यूंची संख्या बऱयाच प्रमाणात वाढली असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षात कोविडचा संसर्ग वाढला होता आणि त्याचा परीणाम सर्वच गोष्टीवर झाला होता. पर्यटन व्यवसायही त्याला अपवाद नव्हता. त्यामुळे गेल्या दोन वर्षात पर्यटकांची संख्या खूपच कमी होती. यंदा पर्यटकांची संख्या वाढली असल्याने त्याचे परिणाम चांगले झाले असले तरी काही गोष्टींना समोरे जावे लागले. त्यामुळे पर्यटकांनी जबाबदारीने वागणे महत्वाचे आहे. अपघात हा अपघात असतो तो कधीही कसाही होऊ शकतो म्हणूनच वाहन चालविताना प्रत्येकवेळी खबरदारी घेणे महत्वाचे आहे.

पर्यटकांची वाहने सुसाट

जानेवारी ते मे महिन्यात राज्यात मोठय़ा प्रमाणात देशी पर्यटक आले होते. अधिकाधिक देशी पर्यटकांनी गोव्यातील समुद्रकिनारे गजबजून गेले होते. राज्यात येणारे पर्यटक दुचाकी किंवा चारचाकी वाहने भाडय़ाने घेतात आणि स्वतः चालवत गोव्यात फिरतात. राज्यातील रस्त्यांची व्यवस्थित माहिती त्यांना नसते. जीवाचा गोवा करण्यासाठी आलेले पर्यटक सुसाट वाहने चालवत असतात.

मौजेत नियमांचे उल्लंघन

पर्यटक अनेकवेळा नो एंट्रीमध्ये वाहने चालवितात आणि अपघातास कारण ठरतात. बऱयाचवेळा चालत्या दुचाकीवरुन व्हिडिओ शूट केला जातो. मोबाईलच अतिवापर केला जातो. अधिकाधिकवेळा नियम माहिती असूनही मौज करण्याच्या जोषात वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते आणि नंतर जीव गमवून बसतात. काहीवेळ रस्त्यांची माहिती नसते आणि ते काळाचे बळी ठरतात.

गतीच्या नियमांचे पालन करावे

वाहन अपघातात ठार झालेल्यामध्ये अधिकाधिक युवक आहेत. राज्यात वाढती वाहनांची संख्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे दिसून येते. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱयावर वाहतूक पोलीस कारवाई करीत असतात. मात्र प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येकवेळी पोलीस पोचू शकत नाही. त्यामुळे आपल्या सुरक्षेची काळजी आपणच घेतली पाहिजे. वाहन चालवित असताना वाहनाची गती आणि अन्य नियमांचे काटेकोरपणे पालन करा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related Stories

मडगावच्या उल्हास ज्वेलर्स तर्फे वन महोत्सव

Amit Kulkarni

राजधानी एक्सप्रेसमधून आले 368 प्रवासी

Omkar B

सहाय्यक जेलरसह दोन जेलगार्ड निलंबीत

Omkar B

ऍड.अमित पालेकर यांचे आजपासून आमरण उपोषण

Amit Kulkarni

लाटंबार्सेत जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी ओढाताण

Omkar B

प्रो. फुटबॉल स्पर्धेत चर्चिल ब्रदर्स क्लब-यूथ मानोरा बरोबरीत

Amit Kulkarni