जि.प.प्रशासकांच्या सूचनेनुसार सर्व विभागात अभिलेखा वर्गीकरण सुरु : ग्रा.पं. विभागाकडून पाच वर्षांचे अभिलेखा वर्गीकरण पूर्ण : शनिवारी साप्ताहिक सुट्टी दिवशीही वर्गीकरणाचे कामकाज सुरु
प्रतिनिधी/कोल्हापूर
पुणे विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार आणि जि.प.चे प्रशासक संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळी अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्व विभागात अभिलेखा वर्गीकरण सुरु झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी साप्ताहिक सुट्टीदिवशीही जि.प.तील बहुतांशी विभागात अभिलेखा वर्गीकरणाचे कामकाज सुरु होते. यामध्ये ग्रामपंचायत विभाग अग्रेसर असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी गेल्या पाच वर्षातील वर्गीकरण पूर्ण झाले आहे.
या मोहिमेंतर्गत सन 2018-19 ते सन 2021-22 या चार वर्षातील अभिलेख निंदणीकरण व नोंदणीकरण, अद्यावतीकरण व नाशन करणे तसेच प्रलंबित प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करणे आदी कामकाजाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत पुणे विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनुसार ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांच्या मार्गर्शनाखाली अभिलेख वर्गीकरण पूर्ण करण्यात आले. सदर मोहिमेत ग्रामपंचायत विभागाकडील सर्व कर्मचारी तसेच हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील 15 कर्मचाऱयांनी सहभाग नोंदवला.
ग्रामपंचायत विभागाच्या वर्गीकरणामध्ये सन 2017 अखेरचे एकुण क वर्ग नाशन पात्र असलेले 290 इतके गठ्ठे अभिलेख कक्षातून नाशन करण्याच्या पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात आले. तसेच क वर्गातील 48, ब वर्गातील 105 गठय़ांचे वर्गीकरण करुन अभिलेख कक्षात पाठविण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अन्य विभागातही अभिलेखा वर्गीकरणाचे कामकाज सुरु आहे.