श्रद्धा हत्या प्रकरणातील आरोपी ः पॉलिग्राफ टेस्ट टळली
@ वृत्तसंस्था / नवी दिल्ली
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा तपास करणाऱया पोलिसांना आता पॉलिग्राफ आणि नार्को टेस्टमुळे मोठे धागेदोरे हाती लागण्याची अपेक्षा आहे. परंतु आफताबची बुधवारी होणरी पॉलिग्राफ टेस्ट टळली आहे. आरोपी आफताबची प्रकृती बिघडली आहे. वैद्यकीयदृष्टय़ा तंदुरुस्त नसल्याने त्याची पॉलिग्राफ टेस्ट बुधवारी होऊ शकलेली नाही.
आफताब चौकशीदरम्यान पोलिसांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहे. याचमुळे आता नार्को टेस्टवर पुढील तपास अवलंबून असणार आहे. तर श्रद्धा हत्या प्रकरणी देशभरातून मोठा संताप व्यक्त होत असल्याने पोलिसांवरील दबाव वाढत आहे. याचमुळे दिल्ली पोलीस विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रमन लांबा यांच्या देखरेखीत चार पोलीस निरीक्षकांचे सल्लागार पथक नेमण्यात आहे. हे पथक या पूर्ण प्रकरणातील घडामोडींवर नजर ठेवून आहे.
आफताबच्या नार्को टेस्टसाठी दिल्ली पोलिसांनी 50 प्रश्नांची यादी तयार केली आहे. आरोपी श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे अन् वापरलेल्या अवजारांना फेकण्याच्याही नोंदी ठेवत होत्या. आफताबच्या फ्लॅटवर मिळालेल्या एका कागदामुळे हा खुलासा झाला आहे. तर श्रद्धाच्या मृतदेहाच्या तुकडय़ांसाठी पोलीस सातत्याने शोधमोहीम राबवत आहेत.