प्रतिनिधी /मडगाव
दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याच्या आरोपावरुन फातोर्डा पोलिसांनी बंगळूरहून एका आरोपींना जेरबंद करुन गोव्यात आणले.
मूळ नेपाळ येथील व सध्या मुगाळी -कुडतरी येथील दिनेश बी. के (27) व सल्मान सिद्धीकी या आरोपींना गोव्यात आणलेल्या या आरोपींना न्यायालयापुढे हजर करण्यात आले तेव्हा न्यायालयाने या आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
फातोर्डा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमीन नाईक, हवालदार निलेश कासकर यांनी या आरोपींच्या मुसक्या बांधल्या.
गोवा चिल्ड्रन्स ऍक्टच्या तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाखाली या दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.