Tarun Bharat

पॅरोलवर बाहेर आलेल्या सोरडी येथील आरोपीची विष प्राशन करून आत्महत्या

जत/प्रतिनिधी

सोरडी (ता. जत) येथील खूनप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने पॅरोलवर सुट्टीवर आला असता राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शशीकांत विठ्ठल शितोळे (वय ३३) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, सोरडी येथील शशीकांत विठ्ठल शितोळे (वय ३३) या आरोपीने जमीनीच्या वादातून खुन केला होता.

त्याच्या विरोधात २०१४ साली उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सात ते आठ महिन्यापासून तो कळंबा कारागृहात होता. त्याला जन्म ठेपची शिक्षा सुनावण्यात आली होती. दीड महिन्यापूर्वी तो पॅरोल रजेवर आला होता. रजेवर आल्यानंतर पत्नी बरोबर वाद झाला होता. त्यानंतर त्याने जत मध्ये एका औषध दुकानात शेतीसाठी औषध पाहिजे म्हणून औषध खरेदी केले. तर जतमधील त्याच्या मित्राने ती औषध बाटली काढून वडाप गाडीने पाठवत त्यांच्या वडीलांकडे देण्यास सांगितले. दरम्यान शशीकांतने दुसऱ्या दिवशी सकाळी त्या वडाप चालकांकडून औषध बाटली घेऊन राहत्या घरी ते औषध प्राशन केले. याबाबत जत पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. मयत हा आरोपी असल्याने त्याच्या पार्थिवावर मिरज येथील शासकिय रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

सांगली : १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध दराबाबत आंदोलन, दूधसंघांनी सहकार्य करण्याचे आवाहन

Archana Banage

सांगली : जिल्हा परिषद शिक्षक हंकारे सरांची ‘वर्ड मॅचिंग’ गेम राष्ट्रीय पातळीवरील बेस्ट गेम

Archana Banage

पहिल्याच सभेत मिरजेवर ६४ लाखांची कृपा

Archana Banage

आघाडीचे मंत्री जयंत पाटील यांच्याकडून शिवसेनेचे खच्चीकरण

Archana Banage

वारणा धरण व चांदोली अभयारण्यग्रस्त प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष मोहिम

Archana Banage

सांगली : वाळव्यात महापुरामुळे जनजीवन विस्कळीत

Archana Banage