Tarun Bharat

खुनानंतर मयताचे कपडे काढल्याची आरोपीची कबुली

मडगाव फ्लायओव्हर पुलाजवळ सापडलेल्या नग्न मृतदेहाचे प्रकरण

प्रतिनिधी /मडगाव

 खून केलेल्या मयताचे कपडे आपणच त्याच्या अंगावरुन काढले होते अशी कबुली प्रशांत बल्ला या 26 वर्षीय आरोपीने दिली.

मडगाव पोलिसांनी ही माहिती दिली. तीन दिवसापूर्वी अमीत किरकेटी (35) या झारखंडच्या इसमाचा मडगावात खून करण्यात आला होता. एका धारदार शस्त्राने वार करुन आरोपीने त्याचा खून केला होता. आरोपीला पोलिसांनी अटक करुन कोठडीत ठेवले तेव्हा आपणच मयताचे कपडे त्याच्या अंगावरुन काढले होते अशी माहिती आरोपी प्रशांत बल्ला याने पोलिसांना दिली.

आरोपीने दाखवलेल्या जागेवर जाऊन पोलिसांनी मयताचे कपडे जप्त केले. मडगावच्या खारेबांद हॉटेलच्या समोरच ही घटना घडलेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related Stories

गोव्याच्या टी-20 सीनियर क्रिकेट संघाची आज लढत ओडिशाशी

Amit Kulkarni

म्हापशासाठी भाई पंडितांचे योगदान महत्त्वाचे : मंत्री लोबो

Amit Kulkarni

फोंडा-मडगाव महामार्गावर वृक्ष कोसळल्याने वाहतूक ठप्प

Omkar B

उद्योग, व्यवसाय बंदीमुळे आर्थिक उलाढाल थांबली

tarunbharat

आयआयटी विरोधकास अटक, तिघांना वॉरंट

Amit Kulkarni

उसकई येथे एक्वेरीक सीटच्या कंपनीला आग लागून 75 लाखांचे नुकसान

Omkar B