Tarun Bharat

वास्कोतील अ.गो. मिनी नरकारसूर वध स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद

मालगुडी बॉईज्च्या नरकासूर वधाला प्रथम बक्षीस

प्रतिनिधी /वास्को

वास्कोत आयोजित करण्यात आलेल्या अनोख्या अखिल गोवा मीनी नरकासुर स्पर्धेत मालगुडी बॉईज कुठ्ठाळी याने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. दुसरे बक्षीस वडेश्वर बाल मंडळ फोंडा याना तर तिसरे बक्षीस मंगलमूर्ती बॉईज् मडकई याना प्राप्त झाले. ही स्पर्धा मुरगांवचे माजी नगराध्यक्ष व वास्को भाजपा मंडळाचे अध्यक्ष दीपक नाईक नागडे यांनी वास्को शहरात आयोजित केली होती. या मीनी नरकासुर स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

मुरगाव पालिका इमारतीसमोर आयोजित केलेल्या या स्पर्धेत 22 मीनी नरकासुर स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत नरकासुर वध व श्रीकृष्ण वेशभूषा सादर करण्यात आली. स्पर्धेतील पहिले उत्तेजनार्थ बक्षीस बेताळ कला संघ, व्दितीय बक्षीस च्यारी ब्रदर्स, तिसरे बक्षीस गजानन क्रिएशन्स बॉईज, चौथे सुयश, पाचवे बक्षीस शिवा नाईक, सहावे किंग टायगर बॉईज, सातवे ब्रह्मस्थळ बॉईज तर आठवे उत्तेजनार्थ बक्षीस संकटमोचक याना देण्यात आले. गेल्यावर्षी प्रथमच सदर स्पर्धा मुरगांव तालुका मर्यादित आयोजित करण्यात आली होती. गेल्य़ा वर्षी स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला होता. यंदा ही स्पर्धा अखिल गोवा स्तरावर घेण्यात आली.

या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार व गोवा प्रदेश भाजपा  सरचिटणीस ऍड. नरेंद्र सावईकर उपस्थित होते. सन्माननीय अतिथी म्हणून आमदार संकल्प आमोणकर, आमदार दाजी साळकर व नगराध्यक्ष लिओ रॉडिग्स उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मुरगांवचे माजी नगराध्यक्ष व वास्को भाजपा मंडळाचे अध्यक्ष दीपक नाईक, उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर, नगरसेवक यतीन कामुर्लेकर, नारायण बोरकर, श्रद्धा महाले, गिरीष बोरकर, विनोद किनळेकर, शमी साळकर, दामोदर नाईक व जयंत जाधव, उमेश साळगांवकर, प्रताप गांवकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरीश नाईक यांनी केले.

Related Stories

मडगाव पालिकेत सीसीटीव्ही कॅमेऱयांचे उद्घाटन

Amit Kulkarni

धारगळ येथे जलवाहिनीचे काम रोखले, स्थानिकांना अगोदर पाणी द्या

Amit Kulkarni

दीपक ढवळीकर यांनी प्रियोळातून प्रचाराचा नारळ फोडला

Amit Kulkarni

जिल्हा पंचायत निवडणुकीत तिरंगी लढत

Patil_p

गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यादगार ठरणार

Patil_p

जागतिक छायाचित्र चषकासाठी मांगीरीश पालकरची निवड

Amit Kulkarni