प्रतिनिधी/ मडगाव
अडीच किलो गांजा जप्तीप्रकरणासंबंधी कोलवा पोलिसानी अटक केलेल्या बांदफोळ -चिंचोणे येथील महम्मद अख्तर मांडोळ या 23 वर्षीय आरोपीला न्यायालयाने 5 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
या आरोपीला शनिवारी कोलवा पोलिसानी न्यायालयापुढे उभे केले तेव्हा न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी फर्मावली.
या आरोपीकडे 2.502 किलो गांजासदृष्य पदार्थ जप्त करण्यात आला होता आणि बाजारात या पदार्थाची किंमत 2,50,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी कोलवा पोलिसांनी या आरोपीविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायदा-1985च्या 20 (ब) (2) (ब) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.