Tarun Bharat

कुख्यात गुंड सचिन जुमनाळकर अद्यापही फरार

प्रतिनिधी,रत्नागिरी :
शहरातील नॅशनल मोबाईल शॉपी चालकावर गोळीबार केल्याचा आरोप असलेला सचिन जुमनाळकर हा मागील काही महिन्यांपासून फरार झाला आहे.कोरोना काळात सचिन याला काही कालावधीसाठी कारागृहातून बाहेर सोडण्यात आले होते.मात्र अद्याप तो जेलमध्ये परतला नसल्याचे समोर येत आहे.दरम्यान रत्नागिरी सत्र न्यायालयापुढे खटला चालू असताना सचिन फरार झाल्याने खटला चालवताना तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत.

रत्नागिरीतील नॅशनल मोबाईल शॉपीचा मालक मनोहर सखाराम ढेकणे ( वय-60, ऱा फडके उद्यान, रत्नागिरी) यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडल्याची घटना घडली होती. 21 फेबुवारी 2020 रोजी ढेकणे हे आठवडा बाजार येथील आपल्या मोबाईल शॉपीमधील काम आटपून दुचाकीने फडके उद्यान येथील घरी जात होते. रात्री 9.30च्या सुमारास सचिन जुमनाळकर याने व त्याच्यासोबत असलेल्या साथीदाराच्या मदतीने ढेकणे यांचा रस्ता अडवल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.यावेळी सचिन याने ढेकणे यांच्याजवळ 50 हजार रूपयांच्या खंडणीची मागणी केली.मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत पैसे देणार नाही, असे ढेकणे यांनी जुमनाळकर याला सांगितले. यावरून वाद निर्माण झाल्याने जुमनाळकर याने चाकूचा धाक दाखवून ढेकणे यांच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र ढेकणे हे बॅग सोडत नसल्याचे लक्षात येताच जुमनाळकर याने आपल्या खिशातील पिस्तुल काढून ढेकणे यांच्यावर गोळी झाडली.

या प्रकरणी शहर पोलिसांत सचिन भीमराव जुमनाळकर (42, रा. बेलबाग रत्नागिरी), मनोहर हनुमंत चालवादी (42, रा. रत्नागिरी) व सिद्धराव नामदेव कांबळे (28, रा. बेलबाग, रत्नागिरी) या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांकडून न्यायालयापुढे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल़ ड़ी बीले यांच्या न्यायालयात हा खटला चालवण्यात येत आहे. सरकारी पक्षाकडून ॲड. प्रफुल्ल साळवी खटला चालवत आहेत़.

जुमनाळकर हा रत्नागिरीमधील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. धनजीनाका येथील फैय्याज हकीम खूनाच्या आरोपाखाली त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मात्र जेल प्रशासनाकडून जुमनाळकर याला पॅरोलची रजा मंजूर केली होती याच काळात पैशाच्या हव्यासापोटी त्याने रत्नागिरीमधील प्रसिद्ध व्यावसायिक मनोहर ढेकणे यांच्यावर गोळीबार केला, असा आरोप ठेवण्यात आला आहे.

Related Stories

”पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे आणि मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही ”

Archana Banage

महिलेवर दुष्कर्म; एट्रोसिटीचा गुन्हा दाखल

Archana Banage

Kolhapur; विधवा महिलांच्या अनिष्ट परंपरा रद्द करणारी शिरोळ नगरपालिका ही जिल्ह्यात पहिली

Abhijeet Khandekar

12 आमदारांचे रद्द केलेले निलंबन असंवैधानिक

datta jadhav

ममता बॅनर्जींना धक्का : प. बंगालमधील हिंसाचार प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश

Tousif Mujawar

पळवून नेताना दुचाकीवरून पडल्यानेच महिलेचा मृत्यू !

Patil_p