वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा अव्वल टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलची यावर्षी दिल्या जाणाऱया मेजर ध्यान चंद खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. पुरस्कार निवड समितीने यासाठी त्याची शिफारस केली. निवृत्त न्यायाधीश न्या. एएम खानविलकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत.
40 वर्षीय शरथ कमलने बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत 3 सुवर्ण व एक रौप्यसह एकूण 4 पदके पटकावली. या कामगिरीचे त्याला बक्षीस मिळाले आहे. या पुरस्कारासाठी एकूण 42 खेळाडूंची यादी होती. त्यापैकी फक्त शरथ कमलची शिफारस करण्यात आली. अर्जुन पुरस्कारासाठी एकूण 25 खेळाडूंची शिफारस करण्यात आली आहे. त्यात लक्ष्य सेन, बॉक्सर निखत झरीन, मल्ल अमित पांघल, आर. प्रज्ञानंद, अंशू मलिक, सरिता मोर, नयनमोनी सायकिया यांचा समावेश आहे. यातील सायकियाने राष्ट्रकुलमध्ये लॉन बॉल्सचे सुवर्ण मिळविले होते. याशिवाय अन्य खेळाडूंचाही समावेश आहे.