Tarun Bharat

भरत जगताप यांना आचार्य अत्रे पुरस्कार

Advertisements

श्रीनिवास पाटील, विजय केंकरे यांचाही सन्मान

पुणे / प्रतिनिधी

साहित्यसम्राट प्रल्हाद केशव अत्रे तथा आचार्य अत्रे यांच्या 124 व्या जयंतीनिमित्त आचार्य अत्रे स्मृती प्रति÷ानतर्फे 11 ते 13 ऑगस्ट या कालावधीत हास्य-विनोद आनंद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या वेळी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रति÷ानचे विश्वस्त वसंतराव कुलकर्णी आणि कमलाकर बोकील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ‘यशस्वी दिग्दर्शक आचार्य अत्रे पुरस्कार’ नाटय़ दिग्दर्शक विजय केंकरे यांना, ‘वक्ता दशसहस्त्रsषु आचार्य अत्रे पुरस्कार’ खासदार श्रीनिवास पाटील यांना, तर डॉ. शर्मदा कलबाग यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा ‘सिद्धहस्त व्यंगचित्रकार आचार्य अत्रे पुरस्कार’ ‘तरुण भारत’चे अर्कचित्रकार भरत जगताप यांना देण्यात येणार आहे.

  महोत्सवाचे यंदाचे 22 वर्ष असून, गुरुवारी (11 ऑगस्ट) सायंकाळी साडेसहा वाजता कलावंत विसुभाऊ बापट यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

 ‘कवी केशकुमार आचार्य अत्रे पुरस्कार’ डॉ. घनःश्याम बोरकर यांच्या ‘खेळीया’ या काव्यसंग्रहाला, ‘आद्य विडंबनकार आचार्य अत्रे पुरस्कार’ अमोल केळकर यांच्या ‘माझी टवाळखोरी’ला, ‘विनोद सम्राट आचार्य अत्रे पुरस्कार’ सॅबी परेरा यांच्या ‘टपालकी’ला, ‘शिक्षणतज्ञ आचार्य अत्रे पुरस्कार’ मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांना, ‘श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे पुरस्कार’ अभिनेते संकर्षण कऱहाडे यांना, ‘थोर रंगकर्मी अभिनेता आचार्य अत्रे पुरस्कार’ अजित केळकर यांना, ‘थोर रंगकर्मी अभिनेता आचार्य अत्रे पुरस्कार’ अभिनेत्री मानसी मागीकर यांना, ‘पत्रमहर्षी आचार्य अत्रे पुरस्कार’ शीतल कर्डे यांना, ‘उद्योगपती आचार्य अत्रे पुरस्कार’ वर्धमान तरवडे यांना, ‘मी कसा झालो?’ अक्षर वाड्.मय पुरस्कार माजी मंत्री सुभाष देसाई यांना, ‘मी कसा झालो?’ अक्षर वाड्.मय आचार्य अत्रे पुरस्कार आनंद म्हसवेकर यांच्या ‘कोणी एकाची रंगयात्रा’ या ग्रंथाला, ‘कऱहेचे पाणी बृहत् आत्मचरित्र आचार्य अत्रे पुरस्कार’ उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल रामभाऊ नाईक यांना, ‘कऱहेचे पाणी बृहत् आत्मचरित्र आचार्य अत्रे पुरस्कार’ ‘देह वेचावा कारणी’ या चरित्रास, ‘श्यामची आई आचार्य अत्रे पुरस्कार’ मधुकर उमरीकर यांना, ‘मी कसा झालो? आचार्य अत्रे पुरस्कार’ निलेश साठे यांच्या साठा उत्तराची कहाणी या ग्रंथास देण्यात येणार आहे. तर, संजीव वेलणकर, उल्हास कार्लेकर आणि धनराज वंजारी यांचा ‘विशेष सत्कार’ करण्यात येणार आहे. पंचवीशे एक रुपयाचा धनादेश आणि सन्मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरुप आहे. महोत्सवाच्या समारोप सत्रात न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

 हे सर्व कार्यक्रम प्रति÷ानच्या विनोद विद्यापीठ, लकाकी रस्ता, केदारेश्वर मंदिरासमोर, शिवाजीनगर येथे होणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.

Related Stories

बांबोळीत आज जमशेदपूर एफसीची लढत नॉर्थईस्टशी

Amit Kulkarni

गोव्याच्या राजकारणाची सूत्र भूमाफिया, भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफियांच्या हातात – संजय राऊत

Abhijeet Shinde

आरोग्य अधिकारी भासवून महिलेने घरात डांबून लुटले

Patil_p

संदीप खांडेपारकरांचे भाजपाला आव्हान

Amit Kulkarni

वाहतूक ठेकेदाराची मनमानी; ट्रकमालक चिंतेत

Amit Kulkarni

लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांची गोवा शिपयार्डला भेट

Amit Kulkarni
error: Content is protected !!