श्रीनिवास पाटील, विजय केंकरे यांचाही सन्मान
प्रतिनिधी /पुणे
साहित्यसम्राट प्रल्हाद केशव अत्रे तथा आचार्य अत्रे यांच्या 124 व्या जयंतीनिमित्त आचार्य अत्रे स्मृती प्रति÷ानतर्फे 11 ते 13 ऑगस्ट या कालावधीत हास्य-विनोद आनंद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रति÷ानचे विश्वस्त वसंतराव कुलकर्णी आणि कमलाकर बोकील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ‘यशस्वी दिग्दर्शक आचार्य अत्रे पुरस्कार’ नाटय़ दिग्दर्शक विजय केंकरे यांना, ‘वक्ता दशसहस्त्रsषु आचार्य अत्रे पुरस्कार’ खासदार श्रीनिवास पाटील यांना, तर डॉ. शर्मदा कलबाग यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा ‘सिद्धहस्त व्यंगचित्रकार आचार्य अत्रे पुरस्कार’ ‘तरुण भारत’चे अर्कचित्रकार भरत जगताप यांना देण्यात येणार आहे.
महोत्सवाचे यंदाचे 22 वर्ष असून गुरुवार दि. 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कलावंत विसुभाऊ बापट यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
‘कवी केशकुमार आचार्य अत्रे पुरस्कार’ डॉ. घनःश्याम बोरकर यांच्या ‘खेळीया’ या काव्यसंग्रहाला, ‘आद्य विडंबनकार आचार्य अत्रे पुरस्कार’ अमोल केळकर यांच्या ‘माझी टवाळखोरी’ला, ‘विनोद सम्राट आचार्य अत्रे पुरस्कार’ सॅबी परेरा यांच्या ‘टपालकी’ला, ‘शिक्षणतज्ञ आचार्य अत्रे पुरस्कार’ मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांना, ‘श्रेष्ठ नाटककार आचार्य अत्रे पुरस्कार’ अभिनेते संकर्षण कऱहाडे यांना, ‘थोर रंगकर्मी अभिनेता आचार्य अत्रे पुरस्कार’ अजित केळकर यांना, ‘थोर रंगकर्मी अभिनेता आचार्य अत्रे पुरस्कार’ अभिनेत्री मानसी मागीकर यांना, याचबरोबर शीतल कर्डे, वर्धमान तरवडे, माजीमंत्री सुभाष देसाई, उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल रामभाऊ नाईक, मधुकर उमरीकर यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. तर, संजीव वेलणकर, उल्हास कार्लेकर आणि धनराज वंजारी यांचा ‘विशेष सत्कार’ करण्यात येणार आहे. पंचवीशे एक रुपयाचा धनादेश आणि सन्मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरुप आहे. महोत्सवाच्या समारोप सत्रात न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
भरत जगताप यांच्या कुंचल्यातून महनीय व्यक्तींची अर्कचित्रे
भरत जगताप हे तरुण भारतमध्ये 1988 पासून सेवा बजावत आहेत. सुमारे 34 वर्षांमध्ये त्यांनी अनेक अर्कचित्रे काढली आहेत. लालकृष्ण अडवाणी, अभिनेते निळू फुले, अमिताभ बच्चन, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, ग. प्र. प्रधान, मनोहर पर्रीकर यांच्यासह अनेक अर्कचित्रांचा यामध्ये समावेश आहे. त्यांच्या अर्कचित्रांची प्रदर्शने बेंगळूर, गोवा, हैदराबाद यासह अनेक शहरांमध्ये झाली आहेत. राष्ट्रपती भवनमध्ये देशभरातील 125 चित्रकारांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यामध्ये भरत जगताप यांनी काढलेल्या प्रणव मुखर्जींच्या अर्कचित्राचाही समावेश होता. आर. के. लक्ष्मण, मंगेश तेंडूलकर, मारिओ मिरांडा आणि वसंत सरवटे यांच्यासारख्या नामवंत व्यंगचित्रकारांनी जगताप यांच्या कलेची प्रशंसा केली आहे.