Achieved sainthood after putting hope away
भरड दत्त मंदिरात किर्तन पंचकचा शुभारंभ
मनुष्यमात्राला आशा आणि वासनां मुळे दुःख प्राप्त होते तर आशा आणि वासनांना अंकीत करून घेणारे संतपदास पोहोचतात,असे प्रतिपादन मालवणच्या कीर्तन महोत्सवाचे पहिले पुष्प गुंफतांना सातारचे ह.भ.प.विलासबुवा गरवारे यांनी केले.
मालवणच्या दत्तमंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा तर्फे ‘ कीर्तन पंचक’या दसऱ्या पासून कोजागिरी पर्यंत सलग पाच दिवस चालणाऱ्या कीर्तन महोत्सवाला गरवारेबुवांच्या ‘वत्सला हरण’ या आख्यानाने प्रारंभ झाला.
बुवांच्या दमदार आवाजाने आणि सुश्राव्य सुमधुर गायकीने उपस्थित कीर्तन रसिकांचे कान तृप्त झाले.
मालवण / प्रतिनिधी