Tarun Bharat

मुतगा न्यू इंग्लिश प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे यश

Advertisements

सांबरा : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित न्यू इंग्लिश प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाळेकुंद्री खुर्द येथे झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले. स्पर्धेत मुला-मुलींच्या थ्रो बॉल संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. मुलांच्या रिले संघाने प्रथम, 100 मी. धावणेमध्ये धनश्री पाटील-प्रथम, 600 मीटर धावणे द्रौपदी हुची-तृतीय, थाळी फेक व गोळा फेक योगिता पाटील-द्वितीय, 600 मीटर धावणे भावेश बिरादार-प्रथम, लांबउडी मंथन पालकर-प्रथम, आणि बुद्धिबळ स्पर्धेत वैजनाथ पाटील, विवेक धामणेकर, सेजल मोदगेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांची तालुका पातळीवर निवड झाली आहे. सर्व खेळाडूंचे शाळा सुधारणा समितीच्यावतीने अभिनंदन केले जात आहे. मुख्याध्यापक एस. आर. तिरवीर व इतर शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

Related Stories

बुरुड समाजाच्या समस्या सोडवा

Amit Kulkarni

डुआथ्लॉन स्पर्धेत विक्रांत, विनायक, सृष्टी, मेघ, गुलझार, मुबारक, श्रेया, संतोष विजेते

Patil_p

रामलिंगखिंड गल्ली येथे बेशिस्त वाहन पार्किंग

Patil_p

सैन्य भरतीसाठी ग़जिल्हा प्रशासन सज्ज 4-15 फेब्रुवारीपर्यंत चालणार भरतीची प्रक्रिया

Omkar B

आता लाकडी घाण्याकडे वळू लागली पावले

Amit Kulkarni

मुडेवाडी-डुक्करवाडी-हत्तरगुंजी रस्त्यावर भुयारी पुलाची मागणी

Patil_p
error: Content is protected !!