प्रतिनिधी /बेळगाव
भारतीय विद्यालय हायस्कूलच्या मुलींच्या व्हॉलीबॉल संघाने शहापूर विभागीय क्रीडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. त्याबद्दल सर्व खेळाडूंचे शाळा व संस्थेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पी. एस. लमाणी व क्रीडा शिक्षक सुधीर माणकोजी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.