Achra beach cleaning campaign–
जागतिक स्वच्छ सागर किनारा दिनाचे औचित्य साधून आचरा येथे आचरा ग्रामपंचायत तर्फे आचरा किनारा समुद्र किनारी सागर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता मोहिमेत कचरा मोठया प्रमाणात एकत्रित गोळा करण्यात आला या मोहिमेत स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी उपस्थित होते. मोहिमेला आचरा सीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या मोहिमेत सरपंच प्रणया टेमकर, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, मंगेश टेमकर, मुजफ्फ मुजावर, अनुष्का गावकर, दिव्या आचरेकर, तलाठी अनिल काळे, मंदार सरजोशी, पोलीस पाटिल जगन्नाथ जोशी, ग्रामविस्तार अधिकारी कदम, शिक्षण वर्ग, आरोग्य विभाग कर्मचारी, विध्यार्थी वर्ग, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
आचरा / प्रतिनिधी–