परेश सावंत, आचरा प्रतिनिधी
आचरा रामेश्वर संस्थानात रामजन्मोत्सव दिमाखात संपन्न
Achra Devnagari Dumdumli Hail Hail Raghuveer Jayghoshane!
चैत्र शुद्ध नवमीला दुपारी डोक्यावर सूर्यनारायण आल्याने उन्हाचे चटके बसत होते. त्याचवेळी १२.३९ वाजण्याच्या मुहूर्तावर रामजन्माची जय जय रघुवीर ललकारी होताच तोफा दणाणत्या नगारे ताशे झडू लागले. रामजन्म होताच आसमंतात जय जय रघुवीरचा जयघोष दुमदूमु लागला. इनामदार श्री रामेश्वराच्या दरबारी रामजन्माचे पाळणे हलू लागले. यावेळी पूर्ण परिसर भाविकांनी फुलून गेला होता. आचरा नगरीत साजरा होणाऱ्या राम जन्म उत्सव डोळ्यात साठवण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक हजर झाले होते. क्षण होता आचरा नगरीत रामनामाचा नाद नभी पुरता निनादत होता.
जिल्ह्यात गुरुवारी सर्वत्र रामनवमी सोहळा उत्साहात साजरा झाला. श्रीरामाच्या जयघोषाने अवघा जिल्हा दुमदुमून गेला. मालवण तालुक्यातील आचरे येथील इनामदार श्री देव रामेश्वर मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा शाही संस्थानी थाटात साजरा झाला. या मंगलसमयी जय जय रघुवीर समर्थच्या ललकारीबरोबर तोफा कडाडल्या, नगारे धडाडले, आसमंतात गुलाल, अक्षतांची उधळण करण्यात आली. शाही थाटातअतिशय दिमाखदार सोहळा पार पडला.
डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला उत्सव
इनामदार रामेश्वराच्या पुरातन मंदिरात साजरा होणारा रामनवमी उत्सव हा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. आचरा पंचक्रोशी पूर्ण १२ दिवस रामनामात दंग झाली होती. भक्तांच्या गराड्यात आचऱ्याचा सांब सदाशिव पुरता दंग झालेला होता. इनामदार रामेश्वराच्या पुरातन मंदिरात साजरा होणारा रामनवमी उत्सव हा डोळयांचे पारणे फेडणारा ठरला, चैत्र शुद्ध नवमीला दुपारी डोक्यावर सूर्यनारायण आल्याने उन्हाचे चटके बसत असूनही भाविकांना उत्कंठा होती ती रामजन्माची रामेश्वर मंदिराच्या भव्य मंडपात रामदासी बुवांचे कीर्तन सुरू असताना रामजन्म होताच सनई, चौघडे, ताशा, झडणारे नगारे यांचा आवाज आसमंतात दुमदुमला. तोफेच्या सलामीत राम जन्मला ग सखे राम जन्मला’ चा जयघोष सुरू झाला. वाद्यांच्या घोषात सजविलेल्या पाळण्यात चांदीची रामाची बालमूर्ती ठेवून मानकऱ्यांच्या हस्ते पाळणा जोजावत पाळणा गीत म्हटले गेले. रामजन्म प्रसंगी गुलाल, अक्षतांची उदाळण झाली. या क्षणांची याची देही याची डोळा साक्षात अनुभुती हजारो भाविकांनी घेतली. रामनवमी उत्सव आचरा रामेश्वर संस्थानासह संपूर्ण जिल्हयात साजरा करण्यात आला. रामजन्मानंतर श्रीच्या पंचारतीची रामेश्वर मंदिरास जय जय रघुवीर समर्थ घोषात प्रदक्षिणा घालण्यात आली यावेळी श्रींची पंचारतीसह महालदार, चोपदार, छत्रचामर यांच्यासह रामेश्वर मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी रामनामाची गीते सादर करण्यात आली. गुढीपाडव्यापासून गेले आठ दिवस रंगलेल्या रामनवमी उत्सवाचा आज रामनव आनंददायी व मंगलदायी क्षण पाहायला मिळाला. सोहळ उत्सवात मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी दिमाख सहभागी झाले होते.
भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
राम जन्मानंतर उपस्थित सर्व जनता रामेश्वर संस्थानाने केलेल्या महाप्रसादाचा लाभ घेतला या महाप्रसादाच्या पंगतीस जात-पात, धर्माचा विचार न करता, एकाच पंगतीत सर्वधर्मीय नागरिक एकमेकांच्या शेजारी बसून महाप्रसादाचा लाभ घेतला. श्रींचा कृपाशीर्वाद आणि महाप्रसादाचे सेवन करून प्रत्येकजण जीवन सार्थक झाल्याच्या भावनेतून परतत असतो. सुरमयी संगीताच्या मेजवानीचा रामन्मानंतर सायंकाळी नागरिकांनी आनंद लुटला. रात्री पालखी सोहळा पार पडला. यावेळी युवा व तरुणांनी दाणपट्टा, तलवारबाजी, लाठीकाठीची प्रात्यक्षिके करून उत्सवात रंगत आणली होती. उत्सव सुरक्षीत पार पडावा म्हणून देवस्थान कमिटी, आचरा आरोग्य यंत्रणा, ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे व आचरा ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.