ग्राहकसंख्येचा होणार स्विगीला लाभ : अधिग्रहणामुळे व्यवसाय वाढणार
वृत्तसंस्था /बेंगळूर
ऑनलाइन फुड डिलिव्हरी ऍप स्विगीने अलीकडेच डाइनआऊटचे अधिग्रहण करण्याचे निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. या अधिग्रहणानंतर स्विगीच्या एकंदर ग्राहकसंख्येत वाढ होणार आहे.
स्विगीची ही अधिग्रहणाची त्य़ांच्या व्यवसायाला अधिक मजबुती प्राप्त करुन देणारी ठरणार आहे. या अधिग्रहणानंतर डाइनआऊट आपले स्वतःचे स्वतंत्र ऍप सुरूच ठेवणार आहे. अधिग्रहणाची कार्यवाही महिन्याभरात पूर्ण होण्याची शक्यता सांगितली जात आहे. डाइनआऊटच्या अधिग्रहणानंतर याचा लाभ स्विगीला बऱयापैकी होऊ शकणार आहे. डाइनआऊटच्या माध्यमातून स्विगी यापुढेही आकर्षक ऑफर्स ग्राहकांना देऊ शकणार आहे. डाइनआऊटच्या ग्राहकांनाही आता स्विगीच्या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
डाइनआऊटची स्थापना- अंकीत मेहरोत्रा, निखील बक्षी, साहील जैन व विवेक कपूर यांनी 2012 साली डाइनआऊटची स्थापना केली होती. डाइनआऊटच्या माध्यमातून ग्राहकांना 20 शहरातील 50 हजारहून अधिक रेस्टॉरंटमध्ये टेबल राखीव ठेवण्याची सोय असते.