सरकारकडून प्रस्तावाला हिरवा कंदील : 211 कोटींना खरेदी
वृत्तसंस्था/ कोलकाता
पवनहंस लिमिटेडची संपूर्ण हिस्सेदारी स्टार 9 मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड यांनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सरकारने त्यांच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याचे समजते.
संयुक्त कंपनी
पवनहंस लिमिटेड ही भारत सरकार आणि ओएनजीसी यांची एक संयुक्त कंपनी आहे. जी हेलिकॉप्टर आणि एरो मोबिलिटीची सेवा देते. भारत सरकारकडे या कंपनीची 51 टक्के इतकी हिस्सेदारी आहे तर ओएनजीसीकडे एकूण 49 टक्के इतका वाटा आहे.
211 कोटींना खरेदी
स्टार 9 मोबिलिटीने 211 कोटींची बोली सदरच्या हिस्सेदारी खरेदीसाठी लावली होती, जी सरकारने मान्य केली आहे. यासोबत इतरही दोन कंपन्यांनी पवनहंस लिमिटेडच्या हिस्सेदारीसाठी बोली लावली होती. कंपनीच्या ताफ्यामध्ये 42 हेलिकॉप्टर असून त्यामध्ये 41 त्यांनी स्वतः खरेदी केली आहेत, अशीही माहिती देण्यात आली आहे.