ईडीकडून 22 लाखाची मालमत्ता जप्त
वृत्तसंस्था/ श्रीनगर
अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जम्मू-काश्मीरमधील फुटिरवादी नेता शब्बीर शाहचे श्रीनगरमधील घर जप्त केले आहे. दहशतवादाला वित्तपुरवठा करण्याच्या गुन्हय़ाशी निगडित मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशी अंतर्गत ही कारवाई केल्याचे ईडीकडून शुक्रवारी सांगण्यात आले. सुमारे 21.80 लाख रुपयांची किंमत असणारे हे घर श्रीनगरच्या बोत्शाह कॉलनीत आहे.
एनआयएने मे 2017 मध्ये लष्करöए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद आणि अन्य काही जणांच्या विरोधात युएपीए अंतर्गत गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणी चौकशीदरम्यान शाह विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. दगडफेक, बंद आणि अन्य समाजविरोधी कारवायांच्या माध्यमातून काश्मीर खोऱयात अशांतता फैलावण्यात शब्बीर शाह सामील होता. हिज्ब-उल-मुजाहिदीन आणि पाकिस्तानातील अन्य दहशतवादी संघटनांकडून हवालामार्गे शब्बीर शाह याला रक्कम प्राप्त होत होती. या रकमेचा वापर काश्मीर खोऱयात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी केला जात होता असे ईडीने म्हटले आहे.